व्हॉट्सऍप कट्टा   

अपमान आणि उपकार

एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते की एक मित्र दुसर्‍या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो, आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जिवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो; पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो.
 
ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या साहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो, आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो; पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले. हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो की, पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का? लिहिणारा मित्र म्हणाला, जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला, मनाला, भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू ही विस्कळीत होऊन जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत; पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत.
तात्पर्य : माणसाने अपमान तात्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे.
--
मित्रांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी, कारण मित्र आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकतात. चांगले मित्र नेहमी सकारात्मक ऊर्जा देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि तुमच्या यशासाठी प्रेरणा देतात, तर वाईट मित्र चुकीच्या सवयी लावून तुमच्या आयुष्याला नकारात्मक वळण लावू शकतात. संकटसमयी साथ देणारे, प्रामाणिक आणि विश्वासू मित्र तुमच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. योग्य मित्र निवडल्यास तुमचं आयुष्य आनंदी आणि यशस्वी होतं, तर चुकीच्या मित्रांमुळे भविष्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मित्र निवडताना त्यांचे स्वभाव, विचारसरणी आणि वर्तन यांचा विचार करूनच मैत्री करावी.
--
मॅडम : मुलांनो एक दिवस ही पृथ्वी नष्ट होणार आहे.
ना मनुष्य वाचणार, ना प्राणी, ना पक्षी.
मन्या : हात वर करून मॅडमना प्रश्न विचारतो,
मॅडम! त्या दिवशी शाळेत यायचं की नाही?
----------------
कॉलेजमधला मुलांनी भरलेला वर्ग. अचानक एक मुलगा उठून सरांकडे जाऊन म्हणाला, सर, मला वडिलांनी आणलेलं किंमती घड्याळ चोरीला गेलं. आत्ता छोट्या ब्रेकपर्यंत होतं. सर म्हणाले, त्यानंतर कोणी बाहेर गेलं नाही, आणि आतही आलं नाही. वर्गाचे दरवाजे लावण्यात आले, मुलांना डोळ्यांवर पट्टी बांधायला सांगितलं आणि एकेकाचे खिसे तपासताना एका मुलाच्या खिशात घड्याळ सापडलं. ते ज्याचं होतं त्याला देण्यात आलं. कोणी घेतलं होतं हे कोणालाच कळलं नव्हतं.
 
काही वर्षांनी एका उद्योगपतीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यांनी या सरांचे पाय धरले. म्हणाला, मीच तो घड्याळ चोरलेला मुलगा आहे. तुम्ही माझं नाव उघड केलं असतंत तर मी आत्महत्या करायचं ठरवलं होतं, आज मी जिवंत उभा आहे ते तुम्ही नाव न कळू दिल्यामुळे!
तो मुलगा तू होतास होय?

म्हणजे काय सर?

 
अरे माझा कुठलाच विद्यार्थी माझ्या मनातून उतरू नये म्हणून मी पण डोळ्याला पट्टी बांधली होती!
व्यक्तिमत्त्व घडवताना आत्मसन्मान जोपासणं फार महत्त्वाचं असतं. कोणाची निर्भत्सना करून तो खुडू नये, जमलं तर क्षमा करून त्याला पुन्हा एकदा उभारायला मदत करावी.
 

Related Articles